जिये जिये पप्पू कलानी जिये ! 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

801869953_1387631062897958_6358568898000130516_n

जिये जिये पप्पू कलानी जिये !
75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज माजी आमदार पप्पू कलानी यांचा 75 वा वाढदिवस आहे. उल्हासनगर आणि पप्पू कलानी हे एकच समीकरण आहे. आजही उल्हासनगरचा कोणी बाहेरगावी गेला आणि त्याने मी उल्हासनगरला राहतो म्हटल्यावर पप्पू कलाणीचे उल्हासनगर असेच बोलले जाते. तुम्ही पप्पू कलानीला पहिले का? अशी विचारणा होते.*
पप्पू कलानी हे मूळचे व्यापारी. Wine Samrat या नावाने त्यांचा मदिरेचा व्यापक व्यवसाय आहे. व्यापारातून ते राजकारणात वळले त्याचे कारण उल्हासनगरच्या गँगवॉर मधून त्यांच्या काका दुनिचंद कलानी यांची झालेली हत्या. काकाच्या हत्येच्या सूडभावनेने पेटलेल्या पप्पू कलानीचा गँगस्टर झाला.त्यांचा राजकीय जन्म 1986 सालच्या दंगलीतून झाला. सिंधी समाजाचे मसीहा म्हणून सिंधी समाजाने त्यांना डोक्यावर घेतले. 1986 ते 1992 पर्यन्त पप्पू कलानी यांनी उल्हासनगरवर अनभिक्षिक्त सम्राटा सारखे राज्य केले. प्रशासनावरील मजबूत पकड, तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता, मृदुभाषेने समोरच्याला आपलेसे करणे हे गुण त्यांच्यात होते. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांची मर्जी राखण्यात धन्यता मानत असे. अनेक मंत्री कलानी महलला येत असत. कलानी महल व सीमा रिसॉर्ट ही सत्ता केंद्रे बनली होती. याच काळात 20 रुपये चौ. फूट दराने टोलेजंग अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात. डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले व ते 20-25 वर्षे टिकले.अनेक प्रकल्प शहरात आणले. त्यात टाउन हॉल, तरण तलाव, मध्यवर्ती रुग्णालयाचा विस्तार, यासारख्या कामांचा उल्लेख करावा लागेल.
*असा हा सूर्यासारखा तळपणारा तारा अचानक काळवंडला गेल्या. राजकारणात वर्चस्व कायम ठेवण्याच्या नादात गुन्हेगारीच्या विळख्यात अडकला. खून खराबा झाला. एक यशस्वी राजकारणी व सिंधी समाजाचा मसीहा “टाडा आरोपी” म्हणून बदनाम झाला.* ऐन उमेदीच्या काळात 10-12 वर्षे कारागृहात गेला व हा शेर 18 नोव्हेंबर 2017 साली 66 व्या वर्षी म्हातारा झाल्यावर बाहेर आला तो ही राजकीय वरदहस्तामुळे. आजन्म जन्मठेपेतून मुदतपूर्व सुटका झाली. तरीसुद्धा कारागृहातून विधानसभा निवडणूक लढून 3 वेळा विजयी होण्याचा इतिहास रचला.
*टाडातून सुटका झाल्यानंतर दूसरा कोणी नेता असता तर राजकीय सन्यास घेऊन भक्ती मार्गाला लागला असता. पप्पू कलानी हा मात्र त्यास अपवाद ठरला* *नव्या जोमाने पूर्ववत कामाला लागला. पप्पू कलानीचे आकर्षण कमी झाले नाही. वयाची पंच्याहत्तरी पार करूनही पप्पू कलानीचा जोश कमी झाला नाही.* UPP चे स्थान नंतर टीम ओमी कलानीने (TOKने) घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास अपेक्षित यश आले नाही म्हणून मग कधी शिवसेना कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदे सेनेशी दोस्ती का गठबंधन करीत ~करीत तडजोडीने राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पप्पू कलानीला वगळून राजकारणात निभाव लागू शकत नाही हे TOK च्या लक्षात आले. मग पुन्हा पप्पू कलानी हेच तारणहार ठरले.
आजही पप्पू कलानी भोवतीच उल्हासनगरचे राजकारण फिरत आहे. पप्पू कलानीला वगळून उल्हासनगरचे राजकारण करता येणार नाही हे शिंदे पिता- पुत्राने ओळखले व TOK शिंदे सेनेत विलील झाल्यामुळेच उल्हासनगर महापालिकेत सत्ता संपादन करता आली. असे असले तरी पप्पू कलानी सारखा शेर आज शिंदे चरणी लीन झालेला पाहून मन व्यथित होते. लागोपाठ 1986 व 1992 मध्ये निर्विवाद व एकतर्फी यश संपादन केलेल्या पप्पू कलानीला पाहणाऱ्या आमच्या पीढीच्या मनाला हे पटत नाही.
*कलानी महालचा सम्राट खासदार कार्यालयात शिफ्ट होतो, हे पप्पू कलानीस खटकत नसेलच असे नाही*.
वयाची पंच्याहत्तरी गाठूनही पप्पू कलानी हे फिट अँड फाईन आहेत, याचे रहस्य नियमित व्यायाम. आजही पप्पू कलानी बाहेर पडले की त्यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा पडतो.पप्पू कलानीशी एक राजकारणी व पत्रकार म्हणून संबंध आले. त्यामुळे पप्पू कलानी यांचे गुण दोष जवळून पहिले आहेत. ते सर्व विसरून पप्पू कलानी यांच्या बद्धल मला आदर वाटतो. कारण ते सर्वांच्या वेळेला धावून जातात. सुख दुःखात सामील होतात.
उल्हासनगरच्या विकासासाठी परमेश्वर त्यांना उदंड व ठणठणीत आयुष्य देवो याच 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार /माजी नगरसेवक
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!