मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळाला पोलिसांकडून सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट देखावा पारितोषिक

अपनी भाषा में पढ़े! Translate

1

करमाळा प्रतिनिधी:- करमाळा येथील मानाचा तिसरा गणपती ‘भुईकोट किल्ल्याचा राजा’ लोकमान्य टिळक तरुण मंडळ किल्ला विभाग यांनी गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत सादर केलेल्या उत्कृष्ट जिवंत देखाव्यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सलग दुसऱ्या वर्षी पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही कलाकार बाहेरून पैसे देऊन न आणता मंडळातील सदस्य देखावा सादर करतात.

लोकमान्य टिळक तरुण मंडळाने नेहमीच समाजातील ज्वलंत विषयांवर प्रकाश टाकणारे देखावे सादर केले आहेत. यामध्ये सन २०२४ साली  मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष सागर गायकवाड यांनी स्वतः लिहिलेला ‘गाय वाचवा, देश वाचवा’ हा जिवंत देखावा सादर करून पोलीस प्रशासनाचा उत्कृष्ट आरास/देखावा पुरस्कार पटकावला होता. तर मागील वर्षी म्हणजेच सन २०२५ साली मंडळाचे अध्यक्ष दिपक सुरवसे यांच्या कार्यकाळात सागर गायकवाड यांचा स्व:लिखित असलेला ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ हा अत्यंत संवेदनशील आणि मार्मिक सजीव देखावा मंचावर साकारण्यात आला.

2
2

गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या देखाव्याबद्दल व पोलिस प्रशासनाचे आभार मानताना पंचायत समितीच्या सभागृहात सागर गायकवाड यांनी म्हणाले की, “वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी पोटात सात मुली मारून आठव्या मुलासाठी अट्टाहास करणाऱ्या एका कुटुंबाची शोकांतिका आम्ही मांडली होती. या हव्यासात बाळ जन्माला घालताना माऊलीचा मृत्यू होतो आणि पुढे त्याच मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हे भीषण वास्तव आम्ही रंगमंचावर उभे केले. ‘मुलगा हवाच’ या मानसिकतेमुळे लिंग गुणोत्तरात निर्माण झालेली पोकळी दाखवण्याचा हा प्रयत्न होता. हा देखावा पाहताना नागरिकांच्या डोळ्यांत आलेले अश्रू हेच आमचे खरे यश होते.”

तसेच, पोलीस प्रशासनाने आमच्या कलेची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांनी करमाळा पोलिसांचे आभार मानले. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण तरुण टीम आणि कलाकारांच्या कष्टाचे चीज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या दोन्ही वर्षांच्या यशस्वी देखाव्यांमध्ये सागर गायकवाड, अभिजीत कारंडे, युवराज तोडकर आणि साहिल पठाण यांनी कलाकार म्हणून उत्कृष्ट अभिनय केला. अध्यक्ष दिपक सुरवसे यांनी केलेल्या सहकार्यामुळेच देखाव्याचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे सागर गायकवाड यांनी सांगितले. तसेच मंडळातील सर्व सदस्य, किल्ला विभागातील नागरिक यांचे आभार अध्यक्ष दिपक सुरवसे यांनी मानले.

सलग दोन वर्षे उत्कृष्ट देखाव्याचे पारितोषिक मिळवल्यानंतर, आता यावर्षी मंडळाचे नूतन अध्यक्ष अनिकेत चोरगे व त्यांची टीम कोणता नवीन

सामाजिक विषय हाती घेऊन देखावा सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिकेत चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ पारितोषिकांची ‘हॅटट्रिक’ करणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!