योगेश्वर माध्यमिक विद्यालय उदयनगर (डांगर) येथे शिक्षक दिन व संस्थाध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260908-WA0611

योगेश्वर माध्यमिक विद्यालय उदयनगर (डांगर) येथे शिक्षक दिन व संस्थाध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात..

 

अमळनेर : विक्की जाधव.

ग्रामविकास मंडळ संचलित योगेश्वर माध्यमिक विद्यालय, उदयनगर (डांगर), ता. अमळनेर, जि. जळगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती तथा महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब विजय नवल पाटील यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. नव्याने नियुक्त मुख्याध्यापक श्री. योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या संयुक्त कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पी. एस. शिरसाट या होत्या. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे साकारत अध्यापन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांविषयीचा आदर आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी मनोगते व्यक्त केली.

संस्थाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे सादर केली. स्पर्धेत प्रणाली राजेंद्र पाटील हिने प्रथम, रुचिता प्रवीण पाटील हिने द्वितीय, तर समर्थ काशिनाथ मोरे याने तृतीय क्रमांक पटकावला. नंदिनी भटू पाटील, संस्कृती संजय पाटील व भावेश संजय कापडणे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र व पेन देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आदर्श विद्यार्थी-शिक्षिका पुरस्कार कु. नेहा विकास पाटील तर आदर्श विद्यार्थी-शिक्षक पुरस्कार कृष्णकांत सतीश पाटील यांना प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी सर्व विजेत्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती पी. एस. शिरसाट यांनी शिक्षक-विद्यार्थी नात्याचे महत्त्व, संस्कारक्षम शिक्षण आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यध्यापक श्री. योगेश जाधव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!