दौंड नगरपरिषद कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी करावी,जय मल्हार क्रांती संघटनेची मागणी
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची येणारी 235 वी जयंती 7 सप्टेंबर रोजी दौंड नगरपरिषद कार्यालयात शासकीय पद्धतीने साजरी करावी, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य दौंड तालुका प्रवक्ता अक्षय राजू गावडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे . आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती 7 सप्टेंबर रोजी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याबाबत शासन निर्णय (जीआर) आहे.
निवेदन देते वेळी अक्षय अंकुश, दिपक कांबळे, अक्षय गावडे, नितीन भांडवलकर, मुकेश जगताप उपस्थित होते यांनी दौंड नगरपरिषद मुख्याधिकारी तावडे यांना निवेदन देऊन 7सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयात उमाजी नाईक यांचा जयंती कार्यक्रम आयोजित करावा अशी मागणी करण्यात आली.