मदनवाडीकरांसाठी खुशखबर! उद्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
(निलेश गायकवाड)
मदनवाडी (प्रतिनिधी) – मदनवाडी व परिसरातील ग्रामस्थांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध बुधरानी हॉस्पिटल, पुणे व ग्रामपंचायत मदनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या भव्य मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये खालील सुविधा उपलब्ध असणार आहेत –
1. मोफत मोतीबिंदू भिंगरोपण शस्त्रक्रिया शिबीर
2. डोळे तपासणी शिबीर
3. अल्प दरात चष्मे वाटप शिबीर
शिबिराचा दिनांक व वेळ –
उद्या दिनांक 1/9/2026 रोजी सकाळी ठीक 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
शिबिराचे ठिकाण – मारुती मंदिर, मदनवाडी
तरी मदनवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत मदनवाडी व बुधरानी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
टीप – डोळे तपासणी फी फक्त 20 रुपये राहील.