ज्ञानाच्या जोरावर सायमा तेलीची राज्यस्तरीय फेरीकडे वाटचाल; प्रताप महाविद्यालयाचा गौरव
अमळने : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील M.Sc.-II मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी कु. सायमा रज्जाक तेली हिने महाराष्ट्र शासनाच्या ‘कॅम्पस से संसद – अटल ट्रेड, युवा कदम’ अंतर्गत आयोजित ‘विकसित भारत @2047’ GK Quiz Competition मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. दि. २५ ऑगस्ट रोजी आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सायमाने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र शासनाच्या पुढील फेरीसाठी निवड मिळवली असून, पुढील फेरीच्या अनुषंगाने तिची ऑनलाइन मुलाखतही घेण्यात आली.
सायमा तेली ही सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अख्तर तेली यांची बहीण आहे. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तिला प्रा. शशिकांत जोशी, प्रा. वैशाली महाजन, प्रा. सूर्यवंशी-भोसले, प्रा. ममता महाजन यांच्यासह विविध विभागांतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, IQAC प्रमुख प्रा. डॉ. मुकेश भोळे, CCMC विभागप्रमुख प्रा. डॉ. धनंजय चौधरी, सहप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सायमाचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.