“बारामती निंबोडीत विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, वृक्षारोपण आणि मंदिरासमोर पेवर ब्लॉकचे भूमिपूजन”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-10 at 5.20.24 PM

“बारामती निंबोडीत विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, वृक्षारोपण आणि मंदिरासमोर पेवर ब्लॉकचे भूमिपूजन”

—

(निलेश गायकवाड)

बारामती, दि. 9 ऑगस्ट 2026 : प्रतिनिधी

निंबोडी ता. बारामती येथील छत्रपती हायस्कूल निंबोडी मध्ये आज विविध विकास कामांचा कार्यक्रम संपन्न झाला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बारामती पंचायत समितीच्या “सायकल बॅक” उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींचा शाळेपर्यंतचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे.

यावेळी वृक्षारोपण आणि सिद्धेश्वर मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवण्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले. सरपंच संतोष सोनवणे यांनी स्वखर्चाने शाळा परिसरात 100 झाडे लावली. तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोगातून मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू होणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमाला किरण तावरे – सभापती, पंचायत समिती बारामती, शुभांगी ताई आगवणे – उपसभापती, पंचायत समिती बारामती, किशोर माने – गटविकास अधिकारी, पंचायत समिती बारामती, कचर शिंदे – जिल्हा परिषद सदस्य, अनिकेत गावडे – पंचायत समिती सदस्य, मंथन कांबळे, निलेश टिळेकर, प्रशांत दराडे – संचालक, छत्रपती भवानीनगर, गोवेकर सर – मुख्याध्यापक, संतोष सोनवणे – सरपंच, सिद्धेश्वर निंबोडी तसेच अनिल जगताप – ग्राम विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी अधिक परिश्रम घ्यावेत.”

कार्यक्रमाला नामदेव बाड, माऊली बाड, संतोष नगरे, सलीम मुलाने, मंगेश खंडागळे, गणेश खंडागळे, तुषार शिरसागर, जालिंदर सवाने, संपत सवाने, अनिल लांडगे, भानुदास शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!