यशपंढरी इंग्लिश क्लासतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260805-WA1363

यशपंढरी इंग्लिश क्लासतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…

 

अमळनेर : विक्की जाधव.

यशपंढरी इंग्लिश क्लासतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी प्रा. भानुदास गुलाले, माजी सैनिक गणेश पाटील, ईश्वर महाजन, संदीप महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दहावीत इंग्रजी विषयात ९२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम आलेल्या भूषण सुनील भोई याला सायकल देऊन गौरविण्यात आले. तसेच बारावी वाणिज्य शाखेतील गुणवत्ता यादीतील भूमिका लोटन पाटील, कला शाखेतील पल्लवी पाटील, विज्ञान शाखेतील मोहिनी गणेश पाटील, कशिश माहेश्वरी, सहावीची क्लास टॉपर गुंजन धनगर, नववीतील साहील कैलास भिल तसेच २०२५ मधील टॉपर अश्विनी रोहिदास पाटील यांचाही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सायकल देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, इंग्रजी विषयाचे महत्त्व, मोबाईलचा योग्य वापर आणि जीवनातील शिस्त याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. आर. चौधरी यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावूक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश पाटील यांनी केले. यावेळी भविष्यात दहावी किंवा बारावीत इंग्रजी विषयात ९५ गुण मिळविणाऱ्या यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थ्याला स्कुटी बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!