न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

करमाळा शहरात पाणीटंचाईचे संकट – पाण्याचा जपून वापर करण्याचे नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांचे आवाहन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-16 at 8.05.55 PM

करमाळा शहरात पाणीटंचाईचे संकट – पाण्याचा जपून वापर करण्याचे नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – सध्या पाणीसाठा मर्यादित असल्याने, भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि जबाबदारीने करावा, असे कळकळीचे आवाहन करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नगरपालिकेकडून पाणी बचतीसाठी नागरिकांना खालील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यामध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर फक्त जीवनावश्यक कामांसाठीच करावा तसेच गाडी धुणे, बागेला भरमसाठ पाणी देणे यांसारखे अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा त्याचप्रमाणे आपल्या घरातील किंवा परिसरातील गळती असलेले नळ आणि पाइपलाइन त्वरित दुरुस्त करून घ्यावेत. कोठेही पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कोणताही बेकायदेशीर पाणी उपसा करू नये.
“पाणी ही अमूल्य संपत्ती आहे. आज केलेली पाण्याची बचत, उद्याचे सुरक्षित भविष्य आहे,” असे सांगत नागरिकांनी या गंभीर परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा सौ. मोहिनी सावंत यांनी व्यक्त केली.
या आवाहनामध्ये नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांच्यासह उपनगराध्यक्ष मा. श्री. अतुल फंड आणि पाणीपुरवठा सभापती श्री. विक्रमसिंह परदेशी यांनीही सहभागी होऊन शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!