द्रौ रा कन्या शाळेत मोठ्या थाटात प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न.
अमळनेर : विक्की जाधव.
खा.शि.मं.संचलित श्रीमती.द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळा अमळनेर मध्ये शाळेचा पहिलाच दिवस मोठ्या थाटात उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी मोठ्या आतिशबाजीसह प्रत्येक विद्यार्थीनींचे औक्षण करुन फुलांचा वर्षाव करत ढोल ताशाच्या तालावर स्वागत करुन गुलाब पुष्प देण्यात आली.
या वेळी अध्यक्षतेस्थानी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील साहेब होते.प्रमुख पाहुणे म्हणुन खा.शि.मं चे अध्यक्ष श्री विनोदजी अग्रवाल , शालेय समिती चेअरमन श्री जितेंद्र भाऊ जैन ,खा.शि मं जेष्ठ संचालक श्री हरि भिका वाणी , माधुरी शशिकांत राणे प्राथ.शाळेचे चेअरमन श्री प्रदीप भाऊ अग्रवाल ,पोलिस प्रशासनाच्या दामिनी पथकाच्या प्रमुख श्रीमती नम्रता जरे मॕडम , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी ,प्राथ.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री आठवले , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , शिक्षक प्रतिनीधी सौ पी पी जोशी , जेष्ठ लिपिक व प्रतिनिधी श्री शामभाऊ पवार ,जेष्ठ शिक्षक श्री एस एस माळी , जेष्ठ शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे , क्रीडा शिक्षक श्री के आर बाविस्कर उपस्थित होते.
या वेळी शाळेच्या बाहेरुन प्रवेशव्दार वर स्वागत केल्यानंतर शाळेची प्रार्थना , राष्ट्रगीत , राज्यगीत ,संविधानसह प्रतिज्ञा घेऊन सरस्वती पुजन , माल्यार्पन ,दिपप्रज्वलन करुन सुरुवात केली.
पहिल्या दिवशी विद्यार्थीनींना पुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करुन गोड तोंड करण्यात आले.अतिशय बहारदार फुल वर्षाव होत असतांना शाळेतील वातावरण रोमहर्षक , उत्साहवर्धन आनंदाचे होते.पालकांचे सीध्दा बुके देऊन स्वागत करण्यातआले.
या कार्यक्रमास शुभेच्छा पर बोलतांना गट शिक्षण अधिकारी श्री प्रमोद पाटील व मुख्याध्यापिका मॕडमांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थीनींना पुढिल वर्षाचा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम सुत्रसंचलन श्रीमती आर एस सोनवणे व सौ पी पी जोशी मॕडमांनी केले.
आजचा दिवस अतिशय अविस्मरणीय करण्यासाठी सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.