अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारामतीत रक्तदानाचा महाउपक्रम…

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260530-WA0065

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारामतीत रक्तदानाचा महाउपक्रम..

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३२१ रक्तपिशव्यांचे संकलन..

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २८ व २९ मे २०२६ रोजी झालेल्या या शिबिरात एकूण ३२१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

 

संकलित रक्त विविध गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असून रक्तदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरणार आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, विभागप्रमुख डॉ. नकाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उमप, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे तसेच कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!