अमळनेरच्या क्रीडा शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या क्रीडा शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव.

अमळनेर : विक्की जाधव.

क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी घटना नुकतीच घडली असून तालुक्यातील तीन क्रीडा शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ६ वे ग्रामीण साहित्य संमेलन तसेच “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२६” उत्साहात संपन्न झाला.
या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रभरातील कवी, लेखक, गायक, ग्रामीण साहित्यिक, पोवाडाकार, लावणी सम्राट आणि प्रबोधनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी ग्रामीण साहित्याचे संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण, क्रीडा व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, बुके, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये द्रौ. रा. कन्या शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री. एस. पी. वाघ यांना “छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार”, के. पी. सनेर माध्यमिक विद्यालय जैतपीर येथील क्रीडाशिक्षक श्री. हिरालाल रमेश बाविस्कर यांना “राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार” तसेच स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. गोकुळ विक्रम बोरसे यांना “गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
अमळनेरच्या शिक्षकांनी राज्यपातळीवर मिळवलेल्या या यशामुळे तालुक्याच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राच्या मानात भर पडली असून सर्व स्तरातून पुरस्कार विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!