बारामतीत ‘ती’च्या कवितांचा सुरेल उत्सव; महिला दिनानिमित्त कवी संमेलन उत्साहात पार पडले..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामतीत ‘ती’च्या कवितांचा सुरेल उत्सव; महिला दिनानिमित्त कवी संमेलन उत्साहात पार पडले..

कवी मोरोपंतांच्या नगरी मध्ये ‘ती’च्या कवितांनी सर्जनाची बाग फुलवली..

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

– जागतिक महिला दिन निमित्ताने 29 मार्च 2026 रोजी पंचक्रोशी प्रकाशन व रागिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ती’च्या कविता या विषयावर आधारित कवी संमेलन उत्साहात पार पडले. मोरोपंतांच्या नगरीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने स्त्रीशक्ती, संवेदना आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

पंचक्रोशी प्रकाशनच्या पुढाकारातून व रागिणी फाऊंडेशन चे सहकार्यातून आयोजित या संमेलनात ‘कविता’ या विषयावर परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कवितेची निर्मिती प्रक्रिया, कविता हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम आणि साहित्य निर्मिती चिरंतन ठेवण्याचे महत्त्व यावर सखोल चर्चा झाली.

या परिसंवादात प्राचार्य सिताराम गोसावी, माजी प्राचार्य (रयत शिक्षण संस्था), प्रा. डॉ. सीमा नाईक-गोसावी (मराठी विभाग प्रमुख व कला शाखा अधिष्ठाता, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती), वनकवी लक्ष्मण शिंदे (वन अधिकारी, पुणे) तसेच रागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी आपले विचार मांडले. प्राचार्य गोसावी यांनी पंचक्रोशी प्रकाशन व रागिणी फाऊंडेशन सारख्या संस्थांमुळे साहित्य चळवळीला बळ मिळत असून साहित्य चिरंतन ठेवण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिकांचे वाचन आवश्यक असल्याचे सांगितले.

‘ती’च्या कविता या विषयावर विविध कवींनी प्रभावी सादरीकरण करत स्त्रीच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्त्री जन्माचा गौरव, तिच्या संघर्षाची कहाणी आणि बदलत्या सामाजिक स्थितीचे प्रतिबिंब या कवितांमधून उमटले. विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या कवींमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचक्रोशी प्रकाशनचे प्रमुख बाळासो करचे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रागिनी फाउंडेशनचे सदस्य प्रकाश आबा शिंदे, शुभांगी चौधर, ज्योती बोधे, सुजाता लोंढे, पूजा आदींची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री अलका रसाळ यांनी केले. शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभागी कवींना प्रमाणपत्रांचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!