मार्मिक’च्या बातमीचा दणका! बोरी नदी पुलावरील अतिक्रमणावर अखेर कारवाई.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मार्मिक’च्या बातमीचा दणका! बोरी नदी पुलावरील अतिक्रमणावर अखेर कारवाई.

अमळनेर : विक्की जाधव 

फर्ची (बोरी नदी) पुलावर वाढलेल्या अतिक्रमणाबाबत ‘मार्मिक’ने केलेल्या ठळक बातमीचा अखेर परिणाम दिसून आला आहे. पुलावर नारळ, सफरचंद व इतर किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची बाब समोर आणल्यानंतर नगरपरिषदेने तत्काळ दखल घेत कारवाई केली. या कारवाईत पुलावरील अतिक्रमित ठेले व विक्रेते हटवण्यात आले असून, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नागरिकांकडून समाधान; प्रशासनाकडून पुढील कारवाईचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून पुलावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ‘मार्मिक’ने यावर प्रकाश टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर नगरपरिषदेने पावले उचलल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, ही कारवाई कायमस्वरूपी राहावी आणि पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!