मारवडमध्ये माता सप्तशृंगी देवी यात्रा उत्सवाचा जल्लोष; भक्तांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन..
अमळनेर : विक्की जाधव.
मारवड व परिसरातील भाविकांसाठी आनंदाची बातमी असून, माता सप्तशृंगी देवीचा यात्रा उत्सव बुधवार, चैत्र शुद्ध १४, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, ग्रामस्थ व यात्रा उत्सव समितीच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

रात्री स्वरांजली ऑर्केस्ट्राचा रंगणार कार्यक्रम
यात्रेनिमित्त रात्री ८:३० वाजता स्वरांजली ऑर्केस्ट्राचा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून भक्तांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनासह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थ मारवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.