मदनवाडीतील श्री हनुमान महाराज यात्रा उत्सवाची जय्यत तयारी;उद्याची उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडीतील श्री हनुमान महाराज यात्रा उत्सवाची जय्यत तयारी;उद्याची उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

(निलेश गायकवाड)

दि. 2 ते 4 एप्रिल दरम्यान धार्मिक, सांस्कृतिक, हजेरी व कुस्ती स्पर्धांचा जल्लोष

मदनवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) : मदनवाडी येथील जागृत देवस्थान ‘श्री हनुमान महाराज’ यांच्या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2026 दरम्यान हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

सर्व गावाकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान महाराज यात्रेत सर्व बांधव एकत्र येत शांततेत आणि उत्सवात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा प्रेरणादायी संगम ठरत आहे.

यात्रेनिमित्त गुरुवारी 2 तारखेला सकाळी श्री हनुमान महाराज जन्मोत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी , दि. 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत शेराणी वाटप रात्री छबीना मिरवणूक पार पडणार आहे. तसेच रात्री 11 वाजता झंकार बिट्स मनोरंजन कार्यक्रम.3 तारखेला तुमचं आमचं जमलं मनोरंजन कार्यक्रम सकाळी 10 वा.सायंकाळी 4 वाजायता कुस्त्यांचे जंगी मैदान.4 तारखेला महिलांसाठी विशेष कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता.

गावासह पंचक्रोशीतील भाविक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. श्रद्धेने नवस फेडण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते.

यात्रा कमिटीच्या वतीने स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था व सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करण्यात आले आहे.

🔶 यात्राकमिटीचे अध्यक्ष रंगनाथ देवकाते यांचे मत
“श्री हनुमान महाराजांची यात्रा ही आपल्या गावाच्या सामाजिक ऐक्याची बंधुभावाची परंपरा जपणारी आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांचा उत्साह यामुळे हा सोहळा अधिक भव्य होत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, पाणी, प्रकाश व सुरक्षेची सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा उत्सव शांततेत व उत्साहात यशस्वी करावा,” असे आवाहन अध्यक्ष रंगनाथ देवकाते यांनी केले.

तसेच सरपंच अश्विनी बंडगर यांनी सर्व गावाकऱ्याला यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!