शिवजयंती निमित्त बालसंस्कार पाठशाळा वर्गाच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन
(निलेश गायकवाड)
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र दिंडोरी प्रणित भिगवण शिवजयंती निमित्त बालसंस्कार पाठशाळा वर्गाच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. भिगवण मध्ये प्रथमच छोटे मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आऊसाहेब अशा अनेक ऐतिहासिक वेशभुषा करून बालसंस्कार वर्गातील या बालगोपाळांची प्रभात फेरी भिगवण परिसरामध्ये लक्षवेधी ठरली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर भिगवण येथे साप्ताहिक बाल संस्कार वर्ग घेतला जातो. श्री भैरवनाथ मंदिरापासून निघालेली ही प्रभात फेरी संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा करत विघ्नहर्ता चौक, जाणता राजा चौक तसेच श्रीनाथ चौक येथे संपन्न झाली. यावेळी बालसंस्कार वर्गातील मुलांनी चौका चौकात पारंपारिक खेळ जसे दांडपट्टा, लाठीकाठी, विविध शारीरिक कसरती तर मुलींनी फुगड्या, लेझीम, वक्तृत्व,घोषणाबाजी करत संपूर्ण भिगवण ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. चिरंजीव यशराज चिरंजीव विश्वराज धवडे ही दोन भावंडे, कु स्वरा व शिव गायकवाड, कु रितिका जांभले कु शुभ्रा गाडे चिरंजीव आर्यन माने कु.माही थोरात कु. मृणाल बोत्रे अनुराज धवडे विराट बाबर सारंग उंडाळे रोहन गुंदेचा या मुलांनी चौकाचौकांमध्ये विविध कलागुणांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन करून सर्व ग्रामस्थांचे मन जिंकून घेतले. कुमारी संस्कृती सचिन वाघ हिने आपल्या उत्तम वक्तृत्व शैलीमध्ये शिवचरित्रपर भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
तंत्रज्ञानाच्या या युगात पारंपारिक खेळ मुले काही अंशी विसरत चालली आहेत पण या अशा उपक्रमांमधून मुलांना चालना मिळाली तर नक्कीच मुलांमध्ये बदल होईल. त्यांची विचारसरणी नक्कीच बदलेल. शाळांमध्ये उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मुलं घेतच आहे पण बालसंस्कार वर्गामध्ये आपले संस्कार नीतिमूल्ये,सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास,वक्तृत्व विकास, कल्पनाशक्ती तसेच धैर्य, खिलाडू वृत्ती यासारख्या विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मुलांना तसेच संस्कार दिले जातात. विविध गोष्टींवर मार्गदर्शन करताना मुलांना अध्यात्माचे महत्त्वही सांगितले जाते. विविध श्लोक स्तोत्र पठणामुळे मुलांची एकाग्रता वाढते नकारात्मकता कमी होऊन मुलं सकारात्मक दृष्टीने विकसित होत आहेत. बालसंस्कार वर्गामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन तसेच वेगवेगळे शिबिरांचे आयोजन केले जाते यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होऊन मुलांमध्ये एक सामाजिक सक्रियता तयार होत आहे असे प्रतिपादन बालसंस्कार वर्ग प्रतिनिधी सौ मेघाताई शेलार यांनी यावेळी केले. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ग्रामस्थांचंही वेळोवेळी मिळणारे सहकार्य यामुळे बालसंस्कार वर्ग निश्चितच सुदृढ होत आहे. यावेळी बालसंस्कार वर्ग सहप्रतिनिधी सौ धनश्रीताई गुरव यांचेही सहकार्य यावेळी लाभले. सुज्ञ पालक श्री तुकाराम धवडे यांचे विशेष उल्लेखनीय सहकार्य यावेळी लाभले. श्री सचिन जांबले व सौ शितल जांबले, सौ तृप्ती गायकवाड सौ वर्षा माने तसेच अंगणवाडी शिक्षिका नंदिनी भोसले मॅडम यांचे अनमोल सहकार्य या प्रभात फेरी दरम्यान बालसंस्कार वर्गास लाभले.