डोनेशन लाखोंचे, पण सुरक्षा शून्य? पालक संतप्त अमळनेरकरांनो सावधान! प्रताप कॉलेजच्या सुरक्षेला भगदाड?
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे बारावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान घडलेल्या प्रकाराने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमळनेर पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार साहिल नन्नेखान पठाण (रा. अमळनेर) याने कोणतेही शैक्षणिक कारण नसताना कॉलेज आवारात प्रवेश करून विद्यार्थ्यांशी वाद घातल्याचा आरोप आहे. परीक्षा सुरू असताना बाहेरील व्यक्तीचा मुक्त संचार ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून यामुळे कॉलेज प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील तरुणींना आपल्या प्रेम जाड्यात फसवण्याचा हा प्रयत्न असून
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, साहिल पठान नामक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून कॉलेज परिसरात फिरताना दिसत होती. तरुण मुलींची नावे विचारणे, ओळखी वाढवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. तर सुरक्षा यंत्रणा नेमकी करत काय होती? विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले का, असा सवाल उपस्थित होत आहे.
साहिल पठाणचे शिक्षण 2022 मध्ये पूर्ण झाले असून त्याचा महाविद्यालयाशी कोणताही अधिकृत संबंध नसल्याची नोंद आहे. तरीही तो आवारात कसा काय फिरत होता?

ओळखपत्र तपासणी, गेटवरील नोंदवही, सीसीटीव्ही देखरेख यांचा वापर कितपत काटेकोर आहे? परीक्षा काळात तरी प्रवेश नियंत्रण कडक असायला नको का? काही शिक्षकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली, ही बाब वेगळी; पण मूळ प्रश्न सुरक्षा व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आहे.
पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पालक आपल्या मुलींना सुरक्षित शिक्षणासाठी येथे पाठवतात. लाखो रुपयांची फी व डोनेशन घेतली जाते, मग विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ठोस आणि पारदर्शक आराखडा का दिसत नाही?
“शून्य-सहिष्णुता” धोरण फक्त कागदावरच आहे का? अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली असली तरी पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक, अनोळखी व्यक्तींना प्रवेशबंदी, हेल्पलाईन, नियमित समुपदेशन आणि सीसीटीव्ही तपासणी हे उपाय तात्काळ राबवले जाणार का? अमळनेरकरांनो, सावधान! आपल्या मुली-पाल्यांशी संवाद ठेवा, त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहा आणि कॉलेज प्रशासनाकडून ठोस उत्तरांची मागणी करा. शिक्षणसंस्था ही विश्वासाची जागा असते तो विश्वास टिकवणे आता व्यवस्थापनाची खरी कसोटी आहे.