अमळनेरमध्ये बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मितीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मितीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मितीचा मोठा खेळ उघड केला आहे. गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या तयार होणारे मद्य, केन, बाटल्या, झाकणं, लेबले, फ्लेवर्ससह तब्बल सुमारे ३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमळनेरच्या नावावर डाग लावणारा हा कारखाना गुपचूप सुरू असल्याचे समोर आले असून संबंधितांवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईमुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या टोळीचा डाव उधळून लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. बनावट मद्यामुळे होणाऱ्या संभाव्य जीवितहानीचा धोका टळला असून, अवैध धंद्यांविरोधात प्रशासनाचा ‘झिरो टॉलरन्स’चा इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. अमळनेरकरांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!