जि .प .शाळा हेडावे येथे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

जि .प .शाळा हेडावे येथे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

अमळनेर : विक्की जाधव.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे व. क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील हेडावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम दि.२३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेडावे येथे पार पडला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊ चे वाटप केले.

 

तसेच कार्यसम्राट माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर पुस्तके ही वाटप केली.  या कार्यक्रमात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस व यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी अमळनेर तालुका शिवसेना प्रमुख सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांची हितगुज साधले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पाटील, रामेश्वर सरपंच गजेंद्र जाधव, उप तालुका प्रमुख विनोद पाटील, महेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य नाना धोंडू पाटील सौ. उमा रविंद्र पाटील, सौ.अनिता सुरेश पाटील, नाना लुकडू पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण धनराज पाटील, हभप दिलीप आबा, सुरेश गंभीर पाटील, प्रदीप पाटील ,रोहीत पाटील, भूषण पाटील ,राज पाटील, अरूण पाटील ,जि. प. मुख्याध्यापिका संगीता लोहार, शिक्षिका उज्वला शिंदे, अंगणवाडी शिक्षिका विमलबाई ढिवरे व गावातील विद्यार्थी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!