प्रताप महाविद्यालयाच्या एनएसएस विशेष श्रमसंस्कार शिबिराचे चिमणपुरी पिंपळे येथे उत्साहात उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयाच्या एनएसएस विशेष श्रमसंस्कार शिबिराचे चिमणपुरी पिंपळे येथे उत्साहात उद्घाटन

 

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. २४ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन सोहळा दि. २४ जानेवारी रोजी श्री गुरुदत्त मंदिर सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. उद्घाटन श्री. निंबा दला चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन व्यक्तिमत्त्व विकास साधावा, तसेच पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि ग्रामस्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रेरणादायी आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एस. बी. नेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हेमंत पवार यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. सुनील राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली राठोड यांनी केले.

यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री. संतोष बापू चौधरी, सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील तसेच श्री. युवराज दगा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थ, मान्यवर, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-स्वयंसेवक उपस्थित होते. या श्रमसंस्कार शिबिरामुळे ग्रामीण विकासास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभक्ती गीताने करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!