संत गाडगेबाबा स्मारकाजवळचा खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण; झोपेचं सोंग घेणाऱ्या पालिकां प्रशासनावर नागरिकांचा संताप 

अपनी भाषा में पढ़े! Translate

संत गाडगेबाबा स्मारकाजवळचा खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण; झोपेचं सोंग घेणाऱ्या पालिकां प्रशासनावर नागरिकांचा संताप 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील पाचपावली देवी मंदिर परिसरातील संत गाडगेबाबा स्मारकाजवळील रस्त्यावर पाइपलाइन दुरुस्तीसाठी खोदलेला भला मोठा खड्डा मागील अनेक दिवसांपासून तसाच असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या मार्गावर, तेही वळणावर असलेला हा खड्डा वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत असून, वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

विशेष म्हणजे, याच ठिकाणी राष्ट्रसंत गाडगेबाबांचे स्मारक असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संतांच्या स्मारकासमोरच खड्डा, कचरा आणि अस्वच्छता दिसत असल्याने अमळनेरकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबांची जयंती असून, त्या पार्श्वभूमीवर तरी पालिकेने तातडीने साफसफाई व दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

पालिकेचे नवनियुक्त नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी महापुरुषांच्या स्मारकांकडे विशेष लक्ष देत स्वच्छता मोहीम राबवावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?” असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!