बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शिवसेना कार्यालयात विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्याचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शिवसेना कार्यालयात विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्याचे वाटप

 

अमळनेर : विक्की जाधव.

वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तके वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडावी, हा बाळासाहेबांचा विचार प्रत्यक्ष कृतीतून जपण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होता.

या कार्यक्रमास शिवसेना गटनेते पंकज चौधरी, बाधकाम सभापती साहेबराव दादा पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास तात्या पाटील तसेच नगरसेवक गुलाब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाला चिकाटी, शिस्त आणि समाजप्रती जबाबदारीची जोड देण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यातूनच बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा पुढे जातो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!