दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या एकत्रित येण्यामुळे कार्यकर्ते कुठे उत्सुकता, संभ्रम आणि निराशा;नेत्यांच्या मुलांची मात्र लॉटरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या एकत्रित येण्यामुळे कार्यकर्ते कुठे उत्सुकता, संभ्रम आणि निराशा;नेत्यांच्या मुलांची मात्र लॉटरी

(निलेश गायकवाड)

इंदापूर तालुक्यात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मात्र, या निवडणुकीत दोघेही आपले जुने मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आणि ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर एकत्र आले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत घड्याळाच्या चिन्हावर समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.

या अनपेक्षित एकत्रित आल्यामुळे राजकीय घडामोडीमुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना आपल्या इच्छा आकांक्षावर पाणी सोडावे लागले. तर नेत्यांच्या मुलांची मात्र लॉटरी लागली आहे. यामुळे कार्यकत्यामध्ये कुठे उत्सुकता, संभ्रम आणि निराशा पहायला मिळाली.

एकेकाळी एकमेकांविरोधात आक्रमक राजकारण करणारे नेते आता एकत्र आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीसे बुचकळ्यात पडलेले दिसत असले, तरी नेत्यांच्या आदेशानुसार निवडणूक यंत्रणेत जोमाने सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे, इच्छुक उमेदवारी नाकारलेल्यांमध्ये तीव्र नाराजीचा फायदा भाजपने घेत त्यांना उमेदवारी दिली आहे. तर काहींनी आपल्या भूमिका गुपितच ठेवल्या आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय घडामोडी अजून काय घडतील नागरिक यांना कसा प्रतिसाद देतील याकडे आपलें लक्ष राहील…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!