श्री मंगळग्रह मंदिरात मंगलध्वनींच्या जयघोषात श्री विद्याविनायक यागास प्रारंभ
अमळनेर : विक्की जाधव.
येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी सकाळी मंगलसुरांच्या जयघोषात श्री विद्याविनायक यागास प्रारंभ झाला. सायंकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीने प्रथम दिवसाची सांगता झाली. यानिमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरात बुद्घीच्या देवतांचा भरभरून आशीर्वाद लाभत आहे. शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 9 विद्यार्थिनींकडून सरस्वती देवींचे हवन करण्यात येईल. त्यानंतर आरती होऊन यागाची सांगता होईल.

गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी शिरीष डहाळे सर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून श्री विद्याविनायक यागाचा प्रारंभ झाला. गणपती पूजन, पंचांग कर्म, गणेशभद्र, गौरी तिलक, नवग्रह, रुद्र आदी विशिष्ट मंडलांची स्थापना झाली. गणपती व सरस्वती देवींचे महाअभिषेक तसेच मोदक आणि पायस आदी द्रवाने विशेष हवन होऊन बलिदान पूर्णाहुती करण्यात आली.