न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

रोजगार निर्मितीत संख्याशास्त्र विषय महत्वाचे -दिपक महाजन यांचे प्रतिपादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोजगार निर्मितीत संख्याशास्त्र विषय महत्वाचे -दिपक महाजन यांचे प्रतिपादन

अमळनेर- विक्की जाधव.

येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) व रुसा अंतर्गत संख्याशास्त्र विभागामार्फत दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी “Career Opportunities in the IT Sector” या विषयावर श्री. दीपक महाजन यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.या प्रसंगी त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल तसेच बिझनेस अ‍ॅनालिटिक्स आदी क्षेत्रांमध्ये संख्याशास्त्राचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. वास्तविक (Real-time) डेटावर आधारित अचूक निर्णय घेण्यासाठी सांख्यिकीय तंत्रांचा कसा प्रभावी उपयोग केला जातो, तसेच उद्योग क्षेत्रात Statistics मुळे अचूकता व कार्यक्षमता कशी वाढते, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.हे सत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी तसेच डेटा विश्लेषण करताना निश्चितच उपयुक्त ठरणार असून, कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व भरगोस प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव हे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी संख्याशास्त्र विषयाचे शिक्षण, संशोधन व औद्योगिक क्षेत्रातील वाढते महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संख्याशास्त्र विभागाचे इन्चार्ज प्रा. उमेश येवले यांनी केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी येथे 16 जानेवारी 2026 रोजी झालेल्या Statistics Quiz Competition मधील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या समारंभप्रसंगी संख्याशास्त्र विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. पी. बी. भराटे, प्रा. जे. सी. अग्रवाल, वरिष्ठ सेवानिवृत्त प्रा. धर्माधिकारी सर, तसेच सहकारी प्राध्यापक प्रा. अनुपम शिसोदे, प्रा. प्रणित सोनवणे, प्रा. कल्पेश पाटील व प्रा. प्रियंका बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. हेमांशु पाटील यांनी केले.संख्याशास्त्र विभागातील कर्मचारी श्री. गुणवंत वाघ, श्री चंद्रकांत ठाकूर व श्री दीपक चौधरी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!