न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांची झेप; मुंदडा स्कूलचा जिल्ह्यात डंका

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांची झेप; मुंदडा स्कूलचा जिल्ह्यात डंका

 

अमळनेर : विक्की जाधव.

होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेर येथील श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. तब्बल ९६ संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची चुणूक दाखवली.

स्पर्धेत चंदन पाटील याने रजत पदक, तर सौम्य पाटील व मोहित वानखेडे यांनी कांस्य पदक पटकावले. तसेच अर्जुन देसले आणि ऋषी सोनवणे यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत मोलाचा अनुभव मिळवला.

या यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोबोटिक्स मुलाखतीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचे प्राचार्य लक्ष्मण सर, रितिक शिखर जैन,योजना ठक्कर, संगीता पाटील तसेच शाळेच्या विज्ञान विभागाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन छाया मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा,नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा, पंकज मुंदडा, ॲडमिनिस्ट्रेटर दीपिका मुंदडा, सर्व पदाधिकारी, प्राचार्य लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को-ऑर्डिनेटर योजना ठक्कर, तसेच शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!