श्री मंगळग्रह मंदिरात दोन दिवस लाभणार विद्यार्थ्यांना बुद्घीच्या देवतांचा आशीर्वाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री मंगळग्रह मंदिरात दोन दिवस लाभणार विद्यार्थ्यांना बुद्घीच्या देवतांचा आशीर्वाद

 

अमळनेर : विक्की जाधव.

श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे गुरुवार, दि. 22 जानेवारी तसेच शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त श्री विद्याविनायक यागाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता या यागाची सुरूवात होऊन सायंकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीने प्रथम दिवसाची सांगता होईल. यानिमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरात दोन दिवस बुद्घीच्या देवतांचा भरभरून आशीर्वाद लाभणार आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आवर्जून या श्री विद्याविनायक यागाप्रसंगी सहभाग नोफ्लदवावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी श्री विद्याविनायक यागाचा प्रारंभ शिरीष डहाळे सर सपत्नीक करतील. यात 9 विद्यार्थ्यांचाही सहभाग राहील. यामध्ये गणपती पूजन आदी पंचांग कर्म, गणेशभद्र, गौरी तिलक, नवग्रह, रुद्र आदी विशिष्ट मंडलांची स्थापना केली जाईल. गणपती व सरस्वती देवींचे महाअभिषेक तसेच मोदक आणि पायस इत्यादी द्रवाने विशेष हवन करून बलिदान पूर्णाहुती करण्यात येईल.

शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 9 विद्यार्थिनींकडून सरस्वती देवींचे हवन करण्यात येईल. त्यानंतर आरती होऊन यागाची सांगता होईल.

श्री विद्याविनायक यागाचा उद्देश

श्री विद्याविनायक यागाचा उद्देश म्हणजे युवापिढीचे होणारे अधःपतन थांबून त्यांना ऊर्जा व सत्मार्ग लाभावा, हा आहे. यासाठी श्री गणेश जन्मोत्सव व सरस्वती जन्मोत्सवाचे औचित्य साधून बुद्धिवर्धक स्तोत्राचे जसे गणपतीअथर्वशीर्ष स्तोत्राचे एक हजार आवर्तन करून श्री मंगलेश्वर गणेशजींना अभिषेक व एक हजार मोदकांचे हवन करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी जी. एस. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून गणेशस्तोत्र व प्रज्ञाविवर्धनस्तोत्र यांचे पाठ करवून घेण्यात येणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!