राष्ट्रीय पातळीवर दिनेश बागडेंची दमदार कामगिरी; सिल्व्हर पदकाला गवसणी.
अमळनेर: विक्की जाधव.
उत्तराखंड येथे १६ ते १८ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १०७ किलो वजनी गटात दिनेश शशी बागडे याने उल्लेखनीय कामगिरी करत सिल्व्हर पदक पटकावले. या गटात देशभरातील विविध राज्यांमधून तब्बल २० नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या लढतीत दिनेशने आपल्या ताकदीचा व आत्मविश्वासाचा प्रत्यय देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
१७० किलो वजन यशस्वीपणे उचलत दिनेश शशी बागडे याने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली. कठोर सराव, जिद्द आणि अपार मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरले आहे. या कामगिरीमुळे दिनेशवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.