शिरुडच्या दोन तरुणांची देशसेवेसाठी भरारी; अभ्यासिकेत गौरव सोहळा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरुडच्या दोन तरुणांची देशसेवेसाठी भरारी; अभ्यासिकेत गौरव सोहळा संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील शिरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेतील दोन तरुणांची भारतीय संरक्षण दलामध्ये निवड झाल्याने परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झालेले कल्पेश माधवराव पाटील व लष्कर आयुध विभागात निवड झालेले धीरज भुरीलाल वैराळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम अभ्यासिकेत उत्साहात पार पडला. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन अभ्यासिकेचे समन्वयक डी. ए. धनगर यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस संतोष नारायण पाटील, माधवराव बळीराम पाटील, पंकज भिला पाटील, भुरीलाल पितांबर वैराळे यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना संतोष पाटील यांनी आजचा तरुण व्यसनाधीनतेकडे वळत असताना शिरुड येथील तरुण अभ्यासिकेत नियमित अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत, याचे समाधान व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना कल्पेश पाटील यांनी शेतीची कामे करून रात्री अभ्यास करत हे यश संपादन केल्याचे सांगितले. प्रामाणिक कष्ट व सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत यश अशक्य नाही, असे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात डी. ए. धनगर यांनी बेरोजगारीच्या काळात स्पर्धा परीक्षा हे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत तरुणांनी मोबाईल व कट्ट्यांवरील गप्पा दूर ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर पाटील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!