प्रताप महाविद्यालयात RUSA अंतर्गत ‘शोधूया स्वतःला, समजूया स्वतःला’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात RUSA अंतर्गत ‘शोधूया स्वतःला, समजूया स्वतःला’ कार्यशाळा उत्साहात संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थविज्ञान विभागात RUSA अंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा “शोधूया स्वतःला, समजूया स्वतःला” दि. १५ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यांकन करता यावे, त्यांच्या गुणविशेषांची ओळख व्हावी तसेच स्वतःमधील ऊर्जेला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आत्मचिंतनाच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख व IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे होते. त्यांनी आत्मपरीक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. डॉ. उल्हास सोनवणे व प्रा. खेमचंद पाटील यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून “Life Balance Sheet” संकल्पना उलगडून दाखवत जीवनात समतोल कसा साधावा, याचे सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अमित पाटील यांच्यासह डॉ. एस. डी. बागुल, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. दिपाली सातपुते, प्रा. कल्याणी पाटील, प्रा. अमोल अहिरे, भगवान पाटील, पंकज भदाणे व मंगला पाडवी यांनी उपस्थिती लावली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन तृतीय वर्ष विद्यार्थिनी माधुरी गुलाबराव पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रीती विठ्ठल पवार यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!