कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालायांमध्ये आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यामध्ये पत्रकारांचा सन्मान

अपनी भाषा में पढ़े! Translate

कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालायांमध्ये आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यामध्ये पत्रकारांचा सन्मान

(निलेश गायकवाड)

पत्रकार समाज प्रबोधनाचे काम करतात, तर शैक्षणिक संस्था शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवितात. पत्रकार आणि शाळा-महाविद्यालये हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. पत्रकार आणि शैक्षणिक संस्था यांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य केल्यास व्यापक समाजप्रबोधन साध्य होईल असे मत कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर यांनी व्यक्त केले.
येथील इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयामध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार भरत मल्लाव, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आकाश पवार, भिगवण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार गायकवाड, जनसेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष बबनराव धायतोंडे, प्रा. संदीप साठे व्यासपिठावर उपस्थित होते. डॉ.मगर पुढे म्हणाले, पत्रकार निस्पृहपणे समाजासाठी जे कार्य करीत आहेत त्याची समाजाने दखल घेऊन त्याबद्दल त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे.
यावेळी भरत मल्लाव, आकाश पवार, विजयकुमार गायकवाड, बबनराव धायतोंडे, नितीन चितळकर, डॉ. काशीनाथ सोलनकर, तुषार क्षीरसागर, महेंद्र काळे, संतोष सोनवणे, अनिल खाडे, संतोष सवाणे, सागर जगदाळे, योगेश चव्हाण, संतोष पवार, महादेव बंडगर, अमोल कांबळे, निलेश मोरे, सागर घरत, तुषार हगारे, निलेश गायकवाड, अरुण भोई, संजय शिंदे, प्रवीण वाघमोडे, गोरख पोंदकुले आदी पत्रकारांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी भरत मल्लाव, डॉ. काशीनाथ सोलनकर, निलेश गायकवाड, तुषार क्षीरसागर, महादेव बंडगर आणि यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी, पत्रकारिता क्षेत्रामध्ये होत असलेले बदल, समाजातील वास्तव मांडण्याची जबाबदारी आणि शैक्षणिक संस्थांशी असलेले नाते यावर आपले विचार मांडले तसेच महाविदयालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाबदद्ल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महादेव वाळुंज यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. प्रशांत चवरे यांनी तर डॉ. बाळासाहेब खरात यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविदयालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!