जीवनदान महाकुंभ अभियानात ६५ बाटल्या रक्त संकलित.

अपनी भाषा में पढ़े! Translate

जीवनदान महाकुंभ अभियानात ६५ बाटल्या रक्त संकलित.

(निलेश गायकवाड)

मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे. परंतु ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ समजले जाते. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून सालाबाद प्रमाणे जीवनदान महाकुंभ 2026 याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या अभियानामध्ये गरजूंना मोफत रक्त देण्याचा उपक्रम या संस्थेमार्फत केला जातो. यावर्षी भिगवण या ठिकाणी 65 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

या रक्तदान अभियानाचे आयोजन येथील भाविकांनी आयोजित केलेले होते. यामध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव, माजी सरपंच दीपिका क्षीरसागर, तृप्ती जाधव, नवनाथ ढेरे, रोहन जाधव, किशोर वाघ, अमोल गायकवाड,गणेश कुसाळकर, प्रसाद मोहिते आदींनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!