राष्ट्रीय वीरगाथा ५.० स्पर्धेत महाराष्ट्राची घवघवीत कामगिरी
१९ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड
नवी दिल्ली/पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली, संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय वीरगाथा ५.० स्पर्धेत महाराष्ट्रातील १९ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत राज्याचा गौरव वाढवला आहे.
नागरिक तसेच सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांच्या शौर्य व बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नागरी सजगता रुजवण्यासाठी २०२१ पासून वीरगाथा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ही स्पर्धा देशातील सर्व २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांतील इयत्ता तिसरी ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी खुली असते.
यंदा महाराष्ट्रातून शालेय स्तरावर तब्बल ३ लाख २२ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जिल्हास्तरावरून ५ हजार ५९ प्रवेशिका राज्यस्तरासाठी निवडण्यात आल्या. राज्यस्तरावरून उत्कृष्ट ठरलेल्या ४०२ प्रवेशिका राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात आल्या होत्या. त्यामधून राष्ट्रीय समितीने देशभरातील केवळ १०० सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड केली असून, त्यात महाराष्ट्रातील १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या १०० विजेत्यांना २६ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण मंत्री यांच्या हस्ते प्रत्येकी १० हजार रुपये पारितोषिक, प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी
गट ३–५ :
सान्हवी शशांक भिंगार्दे – पी.एस.बी. बने इंटरनॅशनल स्कूल, सडवल (कविता)
वर्धन समीर फलके – विद्यामंदिर, बचनी, कोल्हापूर (चित्रकला)
जान्हवी सचिन खोत – झेड.पी. शाळा, जुळेवाडी, सांगली (परिच्छेद)
वेदिका प्रविण कवितके – सिद्धनाथ प्राथमिक विद्यालय, दहिवडी, सातारा (परिच्छेद)
विधी प्रदीप वानखडे – श्रीमती राधादेवी गोयंका विद्यामंदिर हायस्कूल, अकोला (चित्रकला)
मंजुश्री घोरपडे – जि. प. प्रा. शाळा, अथणी, अहिल्यानगर (परिच्छेद)
गट ६–८ :
अर्पित अविनाश जाधव – जि. प. प्रा. शाळा, आलेवाडी, सातारा (मल्टीमीडिया सादरीकरण)
श्रावणी शेखर संकपाळ – इंग्लिश मीडियम हायस्कूल, नाडे, सातारा (कविता)
शिंवाक खोडे – भवन्स भगवानदास पुराहित विद्या मंदिर, नागपूर (चित्रकला)
सावी वैभव मुद्राळे – कासार्डे माध्यमिक विद्यालय, सिंधुदुर्ग (मल्टीमीडिया सादरीकरण)
श्रेया मुकुंद उंबरकर – जवाहर विद्या व कला उच्च माध्यमिक शाळा, जामठी, अकोला (परिच्छेद)
आदित्य अभय गायकवाड – संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, लातूर (परिच्छेद)
शेर्य शंकर लेकुळे – स्विस अकादमी इंग्लिश स्कूल, हिंगोली (चित्रकला)
आरोही प्रवीण पावडे – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी, अहिल्यानगर (चित्रकला)
शमिका सदू गवंडी – झेडपीपीएस क्रमांक १, सिंधुदुर्ग (परिच्छेद)
गट ९–१० :
अवनी खोरी – जगमा वर्ल्ड स्कूल, खेड-दिगर, नंदुरबार (चित्रकला)
समिक्ष शशिकांत मोझर – बी.एस. माध्यमिक विद्यालय, मोरजीवाडा, सातारा (परिच्छेद)
गट ११–१२ :
येलमार दीक्षा बाबासाहेब – भारतमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मायणी, सातारा (परिच्छेद)
सिध्दी शंकर रामुगडे – कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड, सातारा (परिच्छेद)
या सर्व विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अभिनंदन केले आहे. या उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व आयुक्त यांचे मार्गदर्शन लाभले असून, राज्यस्तरावर अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे व अधिनस्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमार्फत करण्यात आली.
पुढील वर्षी अधिकाधिक शाळा व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.