भिगवन पंचायत समिती गणनातून शैलजा गायकवाड भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक
(निलेश गायकवाड)
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवारी 16 जानेवारीपासून नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
भिगवण गणातून पंचायत समितीसाठी डिकसळ येथील शैलजा विजयकुमार गायकवाड या इच्छुक असून त्यांचे पती विजयकुमार गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी असल्याने भाजपा कडून त्यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती मिळत आहे.तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टी भिगवन पंचायत समिती गणातून संधी मिळण्यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत त्यांनी मुलाखत दिली असून पक्षाने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारी पक्ष पक्षनिष्ठ महत्त्वाचे असून पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे सांगितले आहे.त्याचप्रकारे शैलजा गायकवाड यांनी भिगवण गणातील प्रत्येक गावात भेटीगाठी सुद्धा चालू केल्या आहेत.
शैलजा गायकवाड या डिकसळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या व योगेश्वरी महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत.