टाकरखेडे गावात बेकायदेशीर धंद्यांचा उच्छाद ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

टाकरखेडे गावात बेकायदेशीर धंद्यांचा उच्छाद ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

अमळनेर : विक्की जाधव.

टाकरखेडे गावातील बस स्टँड परिसरासह विविध भागांत अवैध देशी-विदेशी दारू विक्री, सट्टा-पत्ते तसेच इतर बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा संघटक श्री. प्रथमेश मधुकर पवार यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. गावातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या या धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बस स्टँड परिसरात दररोज शाळकरी मुले, महिला, प्रवासी व भाविकांची मोठी वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी दारू विक्री व जुगार सुरू असल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरिक सांगत आहेत. शाळा व मंदिर परिसरात दारुड्यांकडून आरडाओरड, शिवीगाळ व असभ्य वर्तन होत असल्याने धार्मिक व सामाजिक शांततेला बाधा पोहोचत आहे. तसेच रात्रीच्या वेळी सिमेंटच्या ट्रकमधून गोण्या उतरवून चोरी केल्या जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.

या सर्व बेकायदेशीर प्रकारांमुळे गावातील शांतता ढासळली असून मारहाण, भांडणे व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तक्रारीची प्रत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आली आहे. अवैध धंद्यांवर विशेष मोहीम राबवून छापे टाकावेत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत तसेच बस स्टँड, शाळा व मंदिर परिसरात वाढीव पोलीस गस्त सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. आता तरी प्रशासन ठोस कारवाई करणार का, याकडे संपूर्ण टाकरखेडे गावाचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!