संत गाडगे महाराज जयंतीपूर्वी उद्यान लेवलिंग (समतल) करणाची महाराष्ट्र परीट (धोबी) मंडळाची नगरपरिषदेकडे मागणी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर: शिरपूर–शहादा रोडलगत श्रीनगर येथील श्री. संत गाडगे महाराज उद्यान (ओपन स्पेस) परिसरात मुरुम टाकून भराव करून जागा लेव्हल (समतल) करण्याची मागणी शिरपूर–वरवाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रसंत श्री. गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छता दूत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने भव्य जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, भाविक, मान्यवर तसेच धोबी समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

मात्र सद्यस्थितीत संत गाडगे महाराज उद्यान परिसरात मोठे व खोल खड्डे पडलेले असून जागा उंच-नीच व खडबडीत झाली आहे. यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपरिषदेने तातडीने मुरुम टाकून योग्य प्रकारे भराव करून जागा समतल करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ही बाब सार्वजनिक हिताची व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याने नगरपरिषदेने तात्काळ सकारात्मक कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती करण्यात आली.

हे निवेदन अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सदाशिव ठाकरे व नगरसेवक बाबासो रोहित रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी,शिरपूर तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, शिरपूर शहराध्यक्ष नितीन जाधव, योगेश धोबी, छोटू धोबी, दिलीप ईशी,  ज्ञानेश्वर येशी,गोलू धोबी आदींसह धोबी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरपूर नगर परिषद स्वीकृत नगरसेवक श्री.माधवराव पाटील यांच्या सत्कार करतांना परीट ( धोबी )सेवा मंडळ शिरपूर..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!