देऊळगावराजे येथे राहणाऱ्या तीन परप्रांतीय नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्यांची थेट येरवडा कारागृहात रवानगी.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – इंस्टाग्रामवर या सोशल प्लॅटफॉर्म वर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तीन युवकांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आले.व्यवसायासाठी आलेल्या
देवुळगाव राजे ता. दौंड जि. पुणे येथे सध्या राहणारे व्यक्ति खुशीलाल घनशाम सहाणी वय-२१ वर्षे ,राजेश प्यारेलाल सहाणी वय ३५ वर्षे दोघे मुळ रा. तेलीयाडीया, पो. तेलपुरखा जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश तसेच मीर हसन मोहम्मद मक्सुदमिया अली वय-२८ वर्षे रा. भगवानपुर जि. कैमुर राज्य बिहार या तिघांनी त्यांचे इंस्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटवरून, दोन जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्यांचे अशा कृत्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवु शकतो तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व समाजामध्ये शांतता रहावी म्हणुन त्यांना वेळीच ताब्यात घेवुन त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई होण्यासाठी मा. विषेश कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक साो, बारामती विभाग, बारामती यांनी केली यांचेकडे हजर केले असता त्यांनी वरील इसमांची १४ दिवस न्यायालयीन कोठडी मंजुर करून येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी केलेली आहे.
सोशल मिडीयावर समाजात तेढ निर्माण करणारे, व्देष पसरवणारे किंवा आक्षेपार्ह मजकुर पोस्ट करणाऱ्या इसमांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे दिलेला आहे.