“नंदुरबार मिरवणूक प्रकरणी आ. अनिल पाटीलांचा आरोप” म्हणाले ऍक्शन ला रिऍक्शन 

अपनी भाषा में पढ़े! Translate

“नंदुरबार मिरवणूक प्रकरणी आ. अनिल पाटीलांचा आरोप” म्हणाले ऍक्शन ला रिऍक्शन 

 

अमळनेर : विक्की जाधव.

नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान घडलेल्या प्रकारावर आ. अनिल पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “नंदुरबारमध्ये काढण्यात आलेल्या या विजयी मिरवणुकीस पोलीस प्रशासनाने नेमकी कोणत्या अटींवर परवानगी दिली होती?” मिरवणुकीदरम्यान कपडे काढायचे अन धमकी, दंड थोपवण्याचे प्रकार आणि गुंड प्रवृत्तीची खुलेआम दहशत दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला.

आ. पाटील यांनी सांगितले की, मिरवणुकीदरम्यान महिलांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असून, स्वतः शिरीष चौधरी, रविंद्र चौधरी आणि त्यांच्या मुलाकडून गावित समाजातील महिलांचा अपमान झाल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले. याचबरोबर अमळनेरमधील काही दंगेखोर नंदुरबारला नेण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

“ही केवळ प्रतिक्रिया नसून ही गुंडशाहीची उघड उदाहरणे आहेत. ही ऍक्शन ला रिऍक्शन होती. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः अमळनेरच्या जनतेला मान खाली घालावी लागली आहे,” असे सांगत आ. पाटील यांनी ही घटना राज्याला अशोभनीय असल्याचे स्पष्ट केले. अमळनेर नगरपरिषद संधर्भात बोलतांना ते म्हटले की जनतेच्या कौलाचा सन्मान करून विकासासाठी काम करण्याच्या सूचना आपण आपल्या नगरसेवकांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

नंदुरबारमधील या घटनांचा डाग अमळनेरच्या प्रतिमेला लागल्याचा खंत व्यक्त करत आ. पाटील म्हणाले, “हा पश्चाताप अमळनेरच्या जनतेला पुढील पाच वर्षे सहन करावा लागणार आहे.” मात्र सत्ता कोणाचीही असो, अमळनेरच्या विकासाच्या पाठीशी आपण उभे राहू, असे ठाम मत त्यांनी मांडले.

यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. किडनॅपिंग, बनावट दारू, जमीन बळकावणे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी गृहमंत्र्यांना विचारणार असल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वैयक्तिक भेट घेऊन माहिती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी नंदुरबारचे माजी पालकमंत्री या नात्याने आ. अनिल पाटील यांनी नंदुरबारच्या जनतेला खुले आवाहन करत, “या गुंडशाहीविरोधात पुढे या, बोला आणि विरोध करा,” असे सांगितले. अमळनेरच्या जनतेने शांतता राखावी व आपापसात वाद टाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!