न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पराभवाचे दुःख न पचलेले विरोधक; ‘आत्मपरीक्षण करा’ सुरेश अर्जुन पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

पराभवाचे दुःख न पचलेले विरोधक; ‘आत्मपरीक्षण करा’ सुरेश अर्जुन पाटील डॉक्टर नगराध्यक्ष, इंजिनिअर उपनगराध्यक्ष; अमळनेर विकासाच्या वेगवान वाटेवर

 

अमळनेर नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता; विरोधकांच्या वल्गनांना झणझणीत प्रत्युत्तर डॉक्टर नगराध्यक्ष, इंजिनिअर उपनगराध्यक्ष; अमळनेर विकासाच्या वेगवान वाटेवर असून सत्ता कुठून चालते यापेक्षा विकास कसा होईल यावर चर्चा करा असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश अजून पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांना दिले प्रत्युत्तर

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मते टाकत स्पष्ट कौल दिला असून, माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र जनतेचा हा कौल काही विरोधकांना अजूनही जाचत असल्याचे चित्र असून, पराभव पचवता न आल्याने ते आता बिनबुडाचे आरोप आणि वल्गना करत असल्याचा घणाघात शिवसेनेने केला आहे. लोकनिर्णयावरच प्रश्नचिन्ह लावण्याची ही भूमिका म्हणजे जनतेच्या बुद्धीचा अपमान असल्याचेही सुरेश पाटील यांनी ठणकावून सांगितले. शिवसेनेने अमळनेर नगरपरिषदेला केवळ राजकीय नव्हे तर उच्चशिक्षित, कार्यक्षम आणि काम करणारे नेतृत्व दिले आहे. नगराध्यक्ष हे डॉक्टर तर उपनगराध्यक्ष हे इंजिनिअर असून, शिक्षण, अनुभव आणि कार्यक्षमता यांचा संगम परिषदेत दिसून येत आहे. “फुकटच्या टीका करण्यापेक्षा विकासाचे काम पाहा,” असा घाणा घात ही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेने शिक्षित नेतृत्वाच्या हातात सत्ता दिल्याने अमळनेरच्या विकासकामांना आता खऱ्या अर्थाने गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“काम नंदुरबारहून चालो वा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून अमळनेर शहर आणि तालुक्याचा विकास माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणारच,” असे ठाम आणि झणझणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांना देण्यात आले. विकास रोखण्याची भाषा करणाऱ्यांना जनता पुन्हा त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला. दरम्यान, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश अर्जुन पाटील यांनी विरोधकांना आरसा दाखवत. “जनतेने तुम्हाला थेट नाकारले आहे. त्यामुळे उगाच वल्गना करण्याऐवजी आधी आत्मपरीक्षण करा,” असे खडेबोल त्यांनी सुनावले. शिवसेना ही बोलघेवड्या राजकारणात न अडकता विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवते आणि जनतेने दिलेला कौल प्रत्यक्ष कामातून सिद्ध करून दाखवणारच असे ते म्हटले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!