विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ग्रामपंचायत राष्ट्रीय कार्यशाळेत लिंगाळी ग्रामपंचायतीचा सहभाग.

अपनी भाषा में पढ़े! Translate

विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ग्रामपंचायत राष्ट्रीय कार्यशाळेत लिंगाळी ग्रामपंचायतीचा सहभाग.
प्रतिनिधी- विकी ओहोळ
8446119158
दौंड – यशदा पुणे येथे दिनांक ८ व ९ जानेवारी रोजी आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. यशस्वी विकास कसा करावा याच्या अभ्यासासाठी व विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या लिंगाळी ग्रामपंचायतीने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्यशाळेमध्ये संपूर्ण देशभरातील आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत राज मंत्रालय दिल्ली सचिव सुशील कुमार लोहाणी व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशु, उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, गिरीश भालेराव, स्नेहा देव तसेच पुणे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी पुणे जिल्ह्यातून आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणुन लिंगाळी ग्रामपंचायतीची या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झाली होती. यावेळी लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे, ग्रामपंचायत अधिकारी मछिंद्र निगडे व अमीर शेख यांनी ग्रामपंचायतीमार्फत महिला स्नेही ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या सहभागामुळे लिंगाळी ग्रामपंचायतीच्या महिला सशक्तीकरणाच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून १२ आशा सेविकांना वाहन शिकवून वाहन परवाना देण्यात आला ग्रामविकासाच्या क्षेत्रात हा सहभाग अत्यंत प्रेरणादायी असा ठरला आहे.
उपस्थितांकडून सर्वांचे स्वागत करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!