न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेर नगरपरिषद : पत्रकार दिगंबर जी महाले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड, 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर नगरपरिषद : पत्रकार दिगंबर जी महाले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील सुप्रसिद्ध मंगळग्रह मंदिराचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ पत्रकार दिगंबर जी. महाले यांची अमळनेर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याने शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीचे वृत्त समजताच राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि धार्मिक क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय असलेले दिगंबर जी. महाले हे निर्भीड मते मांडणारे, समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या अनुभवाचा, अभ्यासाचा आणि व्यापक सामाजिक संपर्काचा नगरपरिषदेला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त केला जात असून, त्यांच्या निवडीकडे शहराच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. निवडीनंतर बोलताना दिगंबर जी. महाले यांनी हा सन्मान अमळनेरच्या जनतेचा असल्याचे नमूद करत, पारदर्शक कारभार, शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेर नगरपरिषदेच्या कार्यात अनुभवसंपन्न आणि संवेदनशील नेतृत्वाची भर पडली असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!