एकनिष्ठेचे फळ! गुलाब पाटील यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा मान शिवसैनिकात आनंद उत्सव 

अपनी भाषा में पढ़े! Translate

एकनिष्ठेचे फळ! गुलाब पाटील यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा मान शिवसैनिकात आनंद उत्सव 

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी बापुसो. श्री. गुलाब काशिनाथ पाटील यांची निवड झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमळनेर शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, निर्भीड वक्ता आणि कार्यकर्त्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या गुलाब पाटील यांची ही निवड म्हणजे निष्ठावान कार्यकर्त्याला मिळालेला सन्मान असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

शिवसेना माजी तालुकाप्रमुख व मार्गदर्शक म्हणून अनेक वर्षे संघटनेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गुलाब पाटील यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून संघर्षमय काळातही साथ सोडली नाही. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांत अंतर्गत संघर्ष, कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय आणि काही ठिकाणी झालेली बंडखोरी अशा पार्श्वभूमीवर निष्ठावान नेतृत्वाची कसोटी लागली होती. मात्र या कठीण काळातही गुलाब पाटील यांची निष्ठा डगमगली नाही.

माजी आमदार शिरीष चौधरी गटाच्या शिवसेनेतून ही निवड करण्यात आल्याने “सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला” अशी प्रतिक्रिया उमटत आहे. आजच्या राजकारणात एकीकडे निष्ठावान लोकांचा काळ राहिला नाही, त्यांच्यावर अन्याय होतो, अशा चर्चां होत असून या निर्णयाने सर्वचं चर्चेळा दुजोरा दिल्याचे बोलले जात आहे. निष्ठा, कर्तृत्व आणि सातत्य यांचा सन्मान करणारा हा निर्णय असल्याचे मत शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

या निवडीमुळे अमळनेरमध्ये शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक बळावला असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गुलाब पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून ते शहराच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी बुलंद आवाज उठवतील, अशी अपेक्षा नागरिक व शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. सर्वत्र आनंद व्यक्त होत असून, निष्ठेचे राजकारण अजूनही जिवंत आहे, हेच या निवडीने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!