अमळनेरातील पत्रकार भवनात पत्रकार दिन सोहळा मोठ्या उत्साहात झाला संपन्न 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरातील पत्रकार भवनात पत्रकार दिन सोहळा मोठ्या उत्साहात झाला संपन्न

 

अमळनेर : विक्की जाधव.

द्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार भुवन(योगा भुवन) अमळनेर येथे करण्यात आले होते.हा सोहळा सर्वच पत्रकारांच्या एकतेचा प्रतीक ठरला.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,व्हॉइस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र पत्रकार संघटना आदी तिन्ही संघटनांच्या वतीने हा सोहळा पार पडला.सुरवातीला जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित पत्रकार बांधवानी सामूहिक पूजन केले.जेष्ठ पत्रकार डीगंबर महाले,पांडुरंग पाटील व संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांना मार्गदर्शन केले.यावेळी विविध क्षेत्रात निवड व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.खा शी मंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर, किरण पाटील,चंद्रकांत काटे,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत,व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष उमेश काटे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रविण बैसाणे यासह तिन्ही पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देऊन पत्रकारांचा सन्मान केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!