श्रमदानातून स्वयंसेवकांनी दिला डिकसळ ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रमदानातून स्वयंसेवकांनी दिला डिकसळ ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश

(निलेश गायकवाड)

येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी डिकसळ (ता. इंदापूर) येथे श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व संरक्षण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून वैचारिक स्वच्छतेचा संदेश दिला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर नुकतेच डिकसळ येथे ‘यूथ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या संकल्पनेवर आधारित संपन्न झाले. या शिबिरात ५० स्वयंसेवक व ५ प्राध्यापक सहभागी झाले होते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सुधीर इंगळे, संस्थेचे संचालक पराग जाधव, विलास वाघमोडे, यशवंत वाघ, अशोक शिंदे, रणजित भोंगळे, संपत बंडगर, सुनिल वाघ, तुषार क्षीरसागर, जावेद शेख, सरपंच मनीषा गवळी, उपसरपंच ज्ञानेश्वरी कुंभार, सुनिल काळे, सतीश काळे, मनिषा पवार, रावसाहेब गवळी, संदीप पाटील, तानाजी सुर्यवंशी, शिवदास सुर्यंवंशी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना ही विदयार्त्यांचे व्यक्तीमत्व विकास घडविणारी कार्यशाळा आहे. महाविदयालयीन जीवनामध्ये राष्टीय सेवा योजनेमध्ये सक्रीय सहभाग घेतल्यास विदयार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडते.
शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून माती व पाणी परीक्षण करण्यात आले. तसेच इंदापूर महाविद्यालयातील डॉ. संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जी.आय.एस मॅपिंग, तर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा इतिहास लेखन व सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. सुधीर इंगळे यांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून माण-खटावची जलक्रांती, डॉ. भगवान माळी यांचे सेंद्रिय शेती – काळाची गरज, डॉ. भास्कर गटकूळ यांचे जलसंधारण – काळाची गरज, डॉ. सुरेंद्र शिरसाट यांचे गावाचा इतिहास, प्रा. अनंत कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व विकास तसेच डॉ. प्रज्ञा लामतुरे यांचे आजची तरुणाई या विषयांवरील व्याख्याने झाली. शिबीरामध्ये रांगोळी स्पर्धा तसेच पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या.
शिबिराचा समारोप वरवंड येथील दिवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे यांच्या उपस्थितीत झाला. शिबिराचे संयोजन प्राचार्य डॉ. तानाजी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल बनसोडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पद्माकर गाडेकर, प्रा. सारिका पाटील, प्रा. विनोद भुजबळ, अतुल गाडे व वैशाली निंबाळकर यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!