पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देऊन पाडळसरे धरणाच्या कामाची केली पाहणी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देऊन पाडळसरे धरणाच्या कामाची केली पाहणी.

 

अमळनेर : विक्की जाधव. 

निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीन प्रत्यक्ष धरणस्थळी भेट दे पाहणी केली. शासनाकडून प्राप्त झालेला निधी, झालेला खर्च, तसेच बांधकामाची सद्यस्थिती याबाबत आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.यावेळी झालेल्या बैठकीत निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता य. म. कडलक यांनी धरणाच्या कामाची तांत्रिक, प्रशासकीय व पुनर्वसनाशी संबंधित माहिती दिली. “धरण उभे राहिले तरी पाणी लोकांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भूसंपादन, पुनर्वसन, कालवे व पाणीपुरवठा यंत्रणा या सर्व बाबी एकाच वेळी समन्वयाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले. नदी सहा महिने वाहत असल्याने कामासाठी मर्यादित वेळ मिळतो, तरीही पूर्ण क्षमतेने काम सुरू असून महाराष्ट्रातील मोठ्या गेट्सपैकी एक असलेले हे धरण असल्याने काम अत्यंत बारकाईने केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी समितीची सकारात्मक व विकासाभिमुख भूमिका मांडली. प्रशासनाला विविध टप्प्यांवर समितीचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याबद्दल कार्यकारी अभियंता कडलक यांनी शासनाच्यावतीने समितीचे विशेष आभार मानले. “बहुतेक ठिकाणी आंदोलन प्रकल्पाच्या विरोधात असतात; मात्र पाडळसरे जनआंदोलन समिती कायम धरणाच्या समर्थनात आणि प्रशासनाच्या पाठीशी उभी आहे, ही दुर्मिळ व अत्यंत सकारात्मक बाब आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!