“शिक्षण, समता आणि स्वाभिमान हाच सावित्रीबाई फुलेंचा वारसा” – सीमाताई रंधे

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परीट महिला मंडळाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सीमा ताई रंधे व दीप प्रज्वलन शिरपूर परीट भगिनी मंडळाच्या अध्यक्षा दिपाली सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आशाताई रंधे (मा. प्रदेशाध्यक्ष) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सीमा व परीट महिला मंडळाच्या भगिनींनी राबवलेले कार्यक्रम व उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून समाजात सकारात्मक संदेश देणारे आहेत. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये संघटन, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागते, असे त्यांनी नमूद केले. या कार्याबद्दल त्यांनी आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि असेच उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुरेखाताई बेडीसकर यांनी सुमधुर गायनातून अभिवादन केले. त्यानंतर आरती येशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण, समाजसुधारणा आणि समतेसाठी केलेल्या अमूल्य कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, समाजसुधारणा आणि समतेसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि समाजातील अंधश्रद्धा, विषमता दूर करण्यासाठी केलेला संघर्ष उपस्थितांना प्रेरणादायी ठरला.

सीमाताई रंधे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची शिदोरी प्रत्येकाने घ्यावी आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक समानता हेच त्यांच्या कार्याचे खरे सूत्र होते.”

कार्यक्रमात महिला मंडळाच्या सदस्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित विचार मांडले. समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत महिलांनी स्वावलंबी, सक्षम आणि जागरूक राहावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. परीट महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळत असून, सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.यावेळी सविता ताई बेडीसकर, दिपाली सूर्यवंशी, सविता वाघ, शितल सैंदाणे, मनीषा हरळे, संगीता सूर्यवंशी, मनीषा भिलाने,छाया बोरसे, ज्योति वाघ, पूजा लुंगसे, मनीषा महाले, विद्या देवरे, वैशाली सपकाळे व परीट महिला मंडळाच्या आदी भगिनी उपस्थित होत्या..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!