खान्देश शिक्षण मंडळ निवडणूक : चुरशीच्या लढतीकडे वाटचाल, निकालाबाबत उत्सुकता शिगेला

अपनी भाषा में पढ़े! Translate

खान्देश शिक्षण मंडळ निवडणूक : चुरशीच्या लढतीकडे वाटचाल, निकालाबाबत उत्सुकता शिगेला

 

अमळनेर : विक्की जाधव.

खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत यंदा वातावरण अधिकच चुरशीचे झाले असून, सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत आता अटीतटीच्या टप्प्यावर येऊन ठेपल्याचे चित्र दिसत आहे. विविध पॅनल्सच्या सक्रिय प्रचारामुळे मतदारांमध्ये चर्चा रंगली असून, अंतिम निकालाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

आशीर्वाद पॅनलने प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे दिसत असले तरी, परिवर्तन पॅनलने शेवटच्या टप्प्यात निवडणुकीत रंगत आणली आहे. डॉ. अविनाश जोशी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने मतदारांपर्यंत पोहोचत संस्थेच्या भविष्यातील धोरणांवर भर दिल्याचे दिसून येत आहे.

या लढतीत पंकज मुंदडे यांनीही प्रभावी प्रचार करत आशीर्वाद पॅनलसमोर आव्हान उभे केले आहे. त्यांच्या संपर्क मोहिमेमुळे काही मतदार गटांमध्ये नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, निवडणूक अधिक चुरशीची होत चालली आहे, असे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, लीना पाटील यांच्या समर्थकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, मतांचे विभाजन कसे होईल, याबाबत अद्याप स्पष्ट चित्र नसल्याने अंतिम निकालावर अनेक घटकांचा प्रभाव राहणार आहे. या निवडणुकीत मारवाडी, जैन, गुजराथी, मराठा तसेच इतर समाजांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेषतः कमल कोचर यांना सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा फायदा होत असल्याची चर्चा आहे. तर अभ्यासू, निष्कलंक व उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. अविनाश जोशी यांना संस्थेच्या विकासावर भर देणाऱ्या मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. संतोष पाटील यांनाही विश्वासार्ह उमेदवार म्हणून काही घटकांकडून पसंती मिळताना दिसत आहे.

उद्या होणाऱ्या मतदानासाठी बाहेरगावी राहणारे मतदार शहरात दाखल होत असून, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता संस्थेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून मतदान करावे, असा सूर विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

एकूणच, खान्देश शिक्षण मंडळाच्या या निवडणुकीत निकाल शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्ट होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. कोणाला संधी मिळते आणि संस्थेच्या कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती जातात, याकडे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!