भरत शहा यांच्याकडून विरोधकांना टीका न करता नम्रतेने निवडणुकीची वाटचाल सुरु
(निलेश गायकवाड )
इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भरत शहा यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून इंदापूर मध्ये विविध राजकीय गणिते बदलली आहेत.
यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट निदर्शनास आली की विरोधकांकडून शहा यांच्या विविध प्रकारे आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्याच्यावर विविध माध्यमातून घणाघाती घात सुरु आहेत.यामध्ये विविध दिग्गज नेते एकत्र येत शहा यांना कुठे तरी प्रतिमा डॅमेज करण्यासाठी विविध प्रयत्न होताना दिसत आहे. एवढं असून सुद्धा शहा यांच्याकडून कोणत्याही प्रकारे त्यांना प्रतिउत्तर किव्हा त्यांना विरोध कुठे पाहायला मिळत नाही. शहा यांनी शांत, सय्यमी भूमिका घेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पत्रकार त्यांना बोलण्यासाठी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत पण शहा यांनी प्रत्येक वेळी आपली शिस्तबद्ध भूमिका ठेवली आहे.
शहा यांनी केली परिसरातील आपली कामे व इंदापूर शहराची व प्रलंबित विकास ही जनतेकडून समजून घेत नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर जोर देत नागरिकांनी देखिल प्रतिसाद देण्यासाठी सुरुवात केली आहे….
त्यामुळे भरत शहा एकदंरीत विरोधकांच्या कोणत्याही टिकेला उत्तर न देता कामाला प्राधान्य देताना दिसत आहेत.