अमळनेर राजकारणात खळबळ भाजपचे शहर उपाध्यक्ष कैलास भावसार शिंदे शिवसेनेत
अमळनेर : विक्की जाधव.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. भाजपचे शहर उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक कैलास भावसार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरचा विश्वास, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दांडगा प्रभाव आणि मा. आमदार शिरीष चौधरी यांच्या सातत्यपूर्ण विकासकामांमुळे शिंदे शिवसेना हा योग्य मार्ग असल्याचे भावसार यांनी स्पष्ट केले.
भावसार यांच्या प्रवेशामुळे प्रभागातील युवा वर्गासह विविध समाजघटकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे जितू भाऊ सोनवणे, दीपक चौधरी, आबा भाऊ चौधरी, सौरभ व ओम भावसार, आणि असंख्य मुस्लिम बांधवांचा या प्रवेश सोहळ्यात मोठा सहभाग होता. अनेक वर्षे भाजपमध्ये विविध पदे सांभाळून सक्रियपणे कार्य करणाऱ्या भावसारांच्या या निर्णयाने शिंदे शिवसेनेचा पक्षविस्तार भक्कम झाला असून, या प्रवेशामुळे भाजपला मोठी किंडर बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या भव्य प्रवेशसोहळ्यात पंकज भावसार, श्रीराम चौधरी, गुलाब पाटील, रियाज मौलाना, अवी जाधव, किरण बहारे, संतोष पाटील, मनोज शिंगाणे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना अमळनेरमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, कैलास भावसारांचा प्रवेश हा शिंदे शिवसेनेसाठी मोठा राजकीय बूस्टर ठरणार असल्याची चर्चा सर्वदूर रंगत आहे.